स्वत:ची कार आहे? मग हे वाचाच!

वृत्तसंस्था
रविवार, 12 मे 2019

- स्वत:ची कार असणाऱ्या व्यक्तींची होऊ अतिरिक्त कमाई.

- केंद्र सरकारकडून केले जात आहेत यासाठी प्रयत्न.

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे स्वत:च्या मालकीची चारचाकी कार असेल तर आता या कारच्या माध्यमातून अतिरिक्त कमाई मिळू शकते. याबाबत केंद्र सरकारकडून परिवहन कायद्यात मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये सांगितले, की केंद्र सरकार 'व्हेइकल पुलिंग' या योजनेचा विचार करत आहे. सध्या देशभरात खासगी वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. असे असल्याने वाहतूक आणि पार्किंगची समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेता रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी व्हावी, यासाठी केंद्र सरकारडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी खासगी गाड्यांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करता यावा, म्हणून परमिट जारी करण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. जर याबाबतचा निर्णय सरकारकडून घेतला गेला तर संबंधित चारचाकी वाहनधारकांच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, नीति आयोगाने एक योजना तयार केली असून, ही सेवा सुरू करण्यासाठी कार मालकांना काही नियम आणि अटींची पूर्तता करावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt to Allow Private Car Owners to Earn Money as Part Time Cabbies in India

टॅग्स