बियाणे खरेदीसाठी जुन्या पाचशेच्या नोटा चालणार 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

 नवी दिल्ली : बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जुन्या पाचशे नोटांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. 

 नवी दिल्ली : बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जुन्या पाचशे नोटांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. 

आर्थिक व्यवहारातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा अचानकपणे बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्यानंतर अनेक शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामातील पिकांकरीता बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी रोखीचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे पिकाचे उत्पादन व दोन वर्षांच्या दुष्काळातून सावरलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर संकटाचे सावट निर्माण झाले होते. 
 
केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग, तसेच राष्ट्रीय व राज्य बियाणे महामंडळाच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील इतर आस्थापनांच्या खत व बियाणे विक्री केंद्रांवर जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा देऊन शेतकरी खरेदी करू शकतील. रब्बी हंगामादरम्यान शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
 

Web Title: Govt allows farmers to buy seeds with old 500 rupee notes