रमजान महिन्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई नको : केंद्र सरकार

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणे थांबवावे, अशी केंद्राकडे मागणी केली होती.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये रमजान महिन्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलामार्फत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. कारण रमजान महिन्यात दहशतवाद्यांविरोधात कोणतीही मोहिम न राबविण्याच्या सूचना आज (बुधवार) केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे रमजानच्या महिन्यात दहशवाद्यांविरोधातील मोहीम काही काळासाठी थांबविण्यात येणार आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अनेकदा चकमक होत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण होत असते. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्यात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणे थांबवावे, अशी केंद्राकडे मागणी केली होती.

Mufti mehbooba

मुफ्ती यांच्या मागणीनुसार, रमजानच्या महिन्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात कोणतेही ऑपरेशन लाँच न करणयाच्या सूचना केंद्र सरकारने सुरक्षा दलाला दिल्या आहेत. मात्र, जर दहशतवाद्यांच्या बाजूने स्वत: हल्ला करण्यात आला तर त्याला प्रत्युत्तर देण्याबाबत मुभा देण्यात आली आहे.

Web Title: Govt asks security forces not to launch operations in Jammu Kashmir during Ramzan