'जीन्स' घातल्याने सरकारी कर्मचाऱयाकडून दंड वसूल

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

बरेली (उत्तर प्रदेश)- जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत असलेल्या सरकारी कर्मचाऱयाने जीन्स पॅण्ट घातल्यामुळे व तोंडामध्ये गुटखा असल्याने जिल्हा दंडाधिकऱयांनी त्याला पाचशे रुपयांचा दंड करून तो वसूल केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारी कर्मचाऱयांना कार्यालयीन वेळेमध्ये गुटखा खाण्यावर बंदी घातली आहे. शिवाय, सरकारी कर्मचाऱयांना कार्यालयीन वेळेत जीन्स पॅण्ट घालण्यावर बंदी आहे.

जिल्हा दंडाधिकारी सुरेंद्र सिंग  हे शुक्रवारी (ता. 21) अचानक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होते. लेखनिक पदावर असलेले हुसेन कुरेशी यांच्या तोंडामध्ये गुटखा व जीन्स पॅण्ट घातल्याचे निदर्शनास आले. जिल्हा दंडाधिकाऱयांनी कुरेशीला 500 रुपये दंड व यापुढे असे वर्तन न करण्याबाबात सुनावले.

Web Title: Govt employee fined Rs 500 for wearing jeans