रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोजगारनिर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका गांधी यांनी केली.

गांधी म्हणाले, "सरकारने रोजगारनिर्मितीसाठी काहीही केलेले नाही. माझ्यामते, हे सरकार रोजगारनिर्मितीमध्ये संपूर्णपणे अपयशी ठरले आहे.' काँग्रेस नेते अहमद पटेल यांनीही सरकारवर टीका केली आहे. "तुम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये नोटाबंदीसंदर्भातील काही आकडेवारी, रोजगारनिर्मितीतील अपयश, रेल्वे सुरक्षा याबाबत काही ऐकले का?' अशी टीका पटेल यांनी ट्विटरद्वारे केली आहे. सीपीआयचे नेते डी राजा यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या वचनांची पूर्तता केलेली नाही. ते रोजगारनिर्मितीबाबत बोलले होते. कोठे आहे रोजगानिर्मिती? सर्व अर्थतज्ज्ञांच्या मते देशात आर्थिक मंदी आली आहे.'

संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी "सबका साथ, सबका विकास' असे सांगत सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली.

Web Title: Govt has failed in job creation : Rahul Gandhi