रुग्णवाहिका न दिल्याने मुलाचा मृतदेह नेला दुचाकीवरून

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्यानंतर मुलाचा मृतदेह घेऊन ते रुग्णालयाबाहेर उभे होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना मृतदेह घरी नेण्यास मदत केली.

बंगळूर - हिट अँड रनमध्ये जखमी झालेल्या तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह घरी नेण्यास रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने पित्याला दुचाकीवरून मुलाचा मृतदेह घरी घेऊन जावा लागल्याची घटना बंगळूरमध्ये घडली आहे.

रविवारी सायंकाळी अनेकल तालुक भागातील कानपूर गेट येथे एका कार चालकाने तीन वर्षांच्या रहिमला उडविले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पित्याने त्याला शासकीय रुग्णालयात आणले. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रहिमच्या वडीलांना या अपघाताची माहिती पोलिसांना दिली नाही. तसेच त्यांनी त्याचे शव विच्छेदन करण्यास नकार दिला, असे पोलिसांनी सांगितले.

रुग्णालयाने रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्यानंतर मुलाचा मृतदेह घेऊन ते रुग्णालयाबाहेर उभे होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना मृतदेह घरी नेण्यास मदत केली. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

Web Title: Govt hospital refuses ambulance, man carries 3-yr-old son's body