'एलआयसी'वरील लोकांच्या विश्‍वासाला सरकारमुळे तडा : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

भाजप सरकार हे लोकांच्या घामाचे पैसे तोट्यात गेलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवित असून, आपला स्वार्थ साधण्यासाठी "एलआयसी'चा साधन म्हणून वापर केला जात असल्याचे कॉंग्रेसने म्हटले होते. 

लखनौ : भारतीय आयुर्विमा महामंडळावर (एलआयसी) असलेल्या लोकांच्या विश्‍वासाला या सरकारमुळे मोठा तडा गेला असून, या विमा संस्थेचे पैसे सरकार तोट्यात जाणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वद्रा यांनी केला आहे. प्रियांका यांनी आज ट्‌विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. 

माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांचा संदर्भ देत प्रियांका यांनी त्यांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, "" मागील अडीच महिन्यांच्या अवधीमध्ये एलआयसीला 57 हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. देशामध्ये एलआयसी हे विश्‍वासाचे दुसरे नाव असून, सामान्य माणूस त्यांचा घामाचा पैसा भविष्यातील सुरक्षेसाठी या संस्थेमध्ये गुंतवितो, भाजप सरकार मात्र लोकांच्या कष्टाचे पैसे बुडणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवित आहे. सरकारचे हे लोकांना केवळ खड्ड्यात घालणारे धोरण आहे.'' तत्पूर्वी कॉंग्रेसनेही याच मुद्यावरून भाजपवर टीका केली होती.

भाजप सरकार हे लोकांच्या घामाचे पैसे तोट्यात गेलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवित असून, आपला स्वार्थ साधण्यासाठी "एलआयसी'चा साधन म्हणून वापर केला जात असल्याचे कॉंग्रेसने म्हटले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt investing LIC money in loss making firms shattering peoples trust says Priyanka Gandhi