''बांग्लादेश युद्धाच्या कार्यक्रमात इंदिरा गांधींचे नावच नाही''

मोदी सरकार इंदिराजींना श्रेय देत नसून सरकार सत्याला घाबरत आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiANI

नवी दिल्ली : 1971 च्या युद्धातील भारताच्या विजयाची आठवण करून देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकार इंदिराजींना (Indira Gandhi) श्रेय देत नसल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकार सत्याला घाबरते, त्यामुळे विजय दिवसानिमित्त (Vijay Diwas) आयोजित कार्यक्रमात त्यांचे नाव घेतले नाही, असे ते म्हणाले. डेहराडूनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यापूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनीही काही लोक इंदिरा गांधींना विसरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

तत्पूर्वी काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की, "काही लोक इंदिरा गांधींचे कार्य विसरण्याचा प्रयत्न करत आहेत. बांगलादेशातील लोकांना हा दिवस आठवतो. जवाहरलाल नेहरूंपासून (Jawaharlal Neharu) इंदिरांपर्यंत त्यांनी लोकशाहीला मदत करण्यासाठी योगदान दिले आहे, परंतु काही लोक 1971 चे योगदान विसरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Rahul Gandhi
दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

50 व्या 'विजय दिना' निमित्त काँग्रेसने गुरुवारी 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या (India Pakistan 1971 War) युद्धात भारतीय लष्कराच्या (Indian Army) शौर्याला सलाम केला आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचे स्मरण केले. दरम्यान, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले की, 1971 च्या युद्धातील शहीद आणि योद्धांचे स्मरण. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताने लोकशाहीचा विचार वाचवण्याची लढाई जिंकली. जय हिंद." तर काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून म्हटले आहे की, "शूर भारतीय सैन्य शांतता आणि समृद्धीची योद्धा आहे. शांतता प्रस्थापित करण्यात भारतीय लष्कराने शौर्य आणि साहसाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बांगलादेशला पाकिस्तानच्या अत्याचारातून मुक्त करणे हे त्याचे उदाहरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com