
PM Security मध्ये मोठा बदल; ADG घेणार पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत अनेकदा चूक झाल्याचे निर्दशनास आले आहे. दरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आता एडीजीने घेतली आहे.
देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ही स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPGची असते. पण आता ही धुरा आता भारतीय पोलीस सेवेतील अतिरिक्त महासंचालक (ADG) स्तरावरील अधिकाऱ्याकडे असणार आहे. (Latest Marathi News)
तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांची सुरुवातीच्या सहा वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली जाईल.
विशेष संरक्षण दल कायदा, 1988 (1988 चा 34) अंतर्गत राजपत्र अधिसूचनेद्वारे जारी केलेल्या नियमांच्या नवीन संचाद्वारे केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी ही मानके निश्चित केली आहेत.
त्यानुसार, केंद्र सरकारमधील संबंधित दर्जाच्या अधिकाऱ्यांना लागू असलेल्या अटी व शर्तींवर केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर अखिल भारतीय सेवांमधील अधिकारी एसपीजीमध्ये नियुक्त केले जातील. (Latest Marathi News)
पूर्वीप्रमाणेच एसपीजीचे मुख्यालय नवी दिल्लीत असेल, असे सांगण्यात आले आहे. संचालकाची नियुक्ती केंद्र सरकारकडून भारतीय पोलीस सेवेच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या स्तरावर केली जाईल.