'सर्जिकल स्ट्राईक' 15 दिवसांनी बदलतात : अखिलेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

लखनौ (उत्तर प्रदेश) : केंद्र सरकारचे सर्जिकल स्ट्राईकचे लक्ष्य दर 15 दिवसांनी बदलत असून ते कधी 'लव्ह जिहाद', तर कधी पाकिस्तानवरून नोटाबंदीपर्यंत पोचते, अशी टीका करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर निशाणा साधला.

आज (मंगळवार) यादव यांनी शहरातील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, "आम्ही विकासाची अनेक कामे केली आहेत. मात्र काही पक्ष असे आहेत की ते दर पंधरा दिवसांनी सर्जिकल स्ट्राईकचे लक्ष्य बदलत आहेत. त्यांनी लव्ह जिहाद पासून सुरुवात केली, त्यानंतर पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक आणि आता नोटाबंदीचा विषय तुमच्या समोर आहे. एका बाजूला समाजवादी पक्ष लोकांसाठी काम करत आहे. तर दुसरीकडे काही शक्ती समाजवादी पक्षाच्या कामात अडथळे आणत आहेत."

यादव पुढे म्हणाले, "नोटाबंदीच्या निर्णयामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे आणि गरीब, शेतकरी त्रस्त झाले आहेत. कोणत्याही देशाने असा निर्णय घेतला तरी तेथील अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.'

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटा बदलण्याच्या नियमांमध्ये अनेकदा बदल करण्यात आल्याबद्दल कॉंग्रेसनेही तीव्र शब्दांत टीका केली आहे.

Web Title: Govt.'s surgical strike changed from "love jihad to Pakistan to demonetisation"