गोव्यात 108 रुग्णवाहिकांमध्ये बसवणार 'जीपीएस'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

गोमेकॉमधील रक्तचाचणी सुविधा अत्याधुनिक व्हावी आणि जनतेला रक्त चाचणीसाठी बाहेर जाऊन पैसे खर्च करावे लागू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत असल्याचे राणे म्हणाले.रक्ताशी निगडित सगळ्या चाचण्या गोमेकॉ मधील करता याव्यात यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गोवा - राज्यातील आरोग्य यंत्रणा अत्याधुनिक करण्यावर सरकारचा भर आहे.त्याचाच भाग म्हणून गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळाचा दर्जा वाढवला जाणार असून सर्वसामांन्यांना आधुनिक सुविधा येत्या 2 महिन्यात उपलब्ध करून दिल्या जातील असे आज आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले.

सर्व 108 रुग्णवाहिकांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवली जाणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केली.

आरोग्य यंत्रणा अत्याधुनिक करण्यासाठी राणे यांनी पुढाकार घेतला आहे.108 रुग्णवाहिकां मध्ये जीपीएस यंत्रणा बसवल्या नंतर नियंत्रण कक्षातुन त्यांचे नियंत्रण करणे शक्य होणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.त्याच बरोबर जून अखेर पर्यंत 108 सेवेचे ऍप सुरु केले जाणार असून त्या माध्यमातून जनतेला 108 सेवेच्या सगळ्या अपडेट्स मिळणार आहेत असे राणे म्हणाले.

गोमेकॉमधील रक्तचाचणी सुविधा अत्याधुनिक व्हावी आणि जनतेला रक्त चाचणीसाठी बाहेर जाऊन पैसे खर्च करावे लागू नयेत यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत असल्याचे राणे म्हणाले.रक्ताशी निगडित सगळ्या चाचण्या गोमेकॉ मधील करता याव्यात यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गोमेकॉची रक्तपेढ़ी अद्ययावत केली जाणार असून डॉ. मल्या यांची रक्तपेढ़ी प्रमुख म्हणून नेमणुक करण्यात आल्याचे राणे यांनी सष्ट केले.

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर रक्ताच्या बहुतेक सगळ्या चाचण्या अवघ्या काही मिनिटा मध्ये करणारे आयस्टैग ही मशीन खरेदी केली जाणार आहे.या मशीनची किंमत साडे चार लाख रुपये असून उत्तर प्रदेश पूर्वी गोव्यात ही मशीन आणून आरोग्य सेवा अद्ययावत बनवली जाणार असल्याचे राणे म्हणाले.गोमेकॉ मधील कामकाज ऑनलाइन व्हावे यासाठी हॉस्पिटल मैनेजमेंट सिस्टीम सुरु केली जाणार असून त्यासाठी प्रक्रिया सुरु केली जाणार असून त्याचा फायदा गोमंतकियांना होईल असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

Web Title: GPS system installed in Ambulance