गोव्यात धान्यसाठा काळ्याबाजाराचा पर्दाफाश

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

वास्को येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून (एनएफएसए) वितरण होत असलेल्या धान्यसाठ्याच्या काळाबाजारप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एबीसी) शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एका खासगी गोदामावर छापा टाकला. या विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई करताना धान्यसाठा व काही सामानासह गोदाम सील केले. या धान्यसाठ्याच्या काळाबाजार प्रकरणात आंतरराज्य रॅकेट असून, विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे असे सांगत, याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

पणजी ः वास्को येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून (एनएफएसए) वितरण होत असलेल्या धान्यसाठ्याच्या काळाबाजारप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एबीसी) शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथील पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एका खासगी गोदामावर छापा टाकला. या विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई करताना धान्यसाठा व काही सामानासह गोदाम सील केले. या धान्यसाठ्याच्या काळाबाजार प्रकरणात आंतरराज्य रॅकेट असून, विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे असे सांगत, याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

महामंडळाच्या या गोदामातील धान्यसाठा गोव्यातील नागरी पुरवठा खात्याच्या विविध तालुक्‍यांमधील गोदामांमध्ये वितरित केला जातो. मात्र, या धान्यसाठ्याचा काळाबाजार होत असल्याची तक्रार एबीसीकडे आली 

होती. हा काळाबाजार व धान्यसाठ्याची वाहतूक रात्रीच्यावेळी केली जात असल्याची माहिती हाती लागली होती. विभागाच्या पथकाने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथे छापा टाकला. या वेळी गोदामाच्या ठिकाणी एका ट्रकामधील धान्याच्या पिशव्या या खासगी गोदामामध्ये उतरवण्याचे काम सुरू होते. पथकाने या ठिकाणी धडक दिली असता ट्रकचा चालक तेथे नव्हता. गोदामात अनेक धान्याच्या पिशव्या होत्या. त्यावरती "एनएफएसए' असे लिहण्यात आलेले होते. या ट्रकमधील धान्यसाठा हा सत्तरी तालुक्‍यात वितरण करण्याऐवजी खासगी गोदामात उतरवण्यात येत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grain market exposes in Goa