बेळगावः ग्रामपंचायत अध्यक्षाने केला सदस्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

बेळगाव - ग्रामपंचायत अध्यक्षाने  सदस्याचा खून केल्याची घटना काकतीनजीकच्या न्यू वंटमुरी येथे गुरुवारी (ता.13)  रात्री घडली. अध्यक्षाने तिघांवर लाठीने डोक्यात हल्ला केल्याने एक जण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना  एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  बेन्याप्पा पाटील असे मृत सदस्याचे नाव आहे.

बेळगाव - ग्रामपंचायत अध्यक्षाने  सदस्याचा खून केल्याची घटना काकतीनजीकच्या न्यू वंटमुरी येथे गुरुवारी (ता.13)  रात्री घडली. अध्यक्षाने तिघांवर लाठीने डोक्यात हल्ला केला यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेन्याप्पा पाटील असे मृत सदस्याचे नाव आहे.

न्यू वंटमुरी येथे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाप्पा वन्नूरे व ग्रामपंचायत सदस्य बनाप्पा ( वय ४२) यांच्यामध्ये काही दिवसापासून अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी वाद सुरू होता. त्यातूनच गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले.

यावेळी संशयित ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाप्पाने बेन्याप्पा यांच्या डोकीत लाठीने हल्ला केला. त्यातवेळी  महांतेश व प्रशांत हे दोघे  भांडण सोडवण्यासाठी गेले असता शिवाप्पाने त्या दोघांनाही मारहाण केली. डोकीत लाठीचा जोरदार मार बसल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, पंचायत सदस्य बेन्याप्पा यांचा  उपचारा दरम्यान गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला. अन्य दोघांवर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. काकती पोलिसानी  घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. काकतीचे पोलिस निरीक्षक श्रीशैल कौजलगी, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन हांचीमनी अधिक तपास करीत आहेत

Web Title: GramPanchayat Member Murder by Sarpanch