कठुआ प्रकरण : पीडिता तर माझ्या नातीसारखी

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

जम्मू कश्मीर : ज्या मुलीवर बलात्कार झाला ती मुलगी तर मला माझ्या नातीसारखी आहे, मी तिच्यासोबत असे दुष्कृत्य कसे करेन? असा प्रश्न कोर्टात सुनावणीवेळी कठुआ प्रकरणातील मु्ख्य ओरोपी सांझीराम याने उपस्थित केला. त्याचबरोबर आपण पीडितेच्या आजोबांसारखे आहोत, त्यामुळे असे दुष्कृत्य मी करणारच नाही, या प्रकरणात मला जाणीपूर्वक गोवले गेले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्याने यावेळी केली. 

जम्मू कश्मीरमधील कठुआ येथे एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती. या घटनेविरोधात सरकारने 12 वर्षांपर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूदही केली. परंतु, आता या प्रकरणातील मुख्य आरोपी मी निष्पाप असल्याचे सांगत आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवताना पक्षपातीपणा केला आहे, असा आरोपही त्याने केला.

कठुआ बलात्कार प्रकरणानंतर या प्रकरणाचा विविध माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात विरोधकांनीही सरकारला टीकेचे लक्ष्य केले होते.

Web Title: Like A Grandfather To Kathua Girl Accused Sanji Ram Tells Supreme Court