esakal | काँग्रेसचे दिवंगत नेते झैलसिंग यांचे नातू भाजपमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

काँग्रेसचे दिवंगत नेते झैलसिंग यांचे नातू भाजपमध्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: पंजाबमध्ये राजकीय विस्तारामध्ये अपयशी ठरलेल्या भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आता अन्य पक्षांतून येणाऱ्या नेत्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंदरजितसिंग यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या मुख्य उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम झाला.

हेही वाचा: 'अब्बाजान' योगींना भोवणार; मुजफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल

पंजाबच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून राज्यात मुख्य लढत सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष अकाली दल यांच्यात आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये केंद्रात सत्ताधारी असलेला भाजप या राज्यात मात्र फारसा चर्चेत नाही.

दीर्घ काळापासुनची अकाली दलाची मैत्री संपल्यानंतर एकाकी पडलेल्या भाजपने आता पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी अन्य पक्षांमधील असंतुष्ट नेत्यांकडे लक्ष देण्यात आले आहे. तसेच पंजाबमधील काही विशिष्ट भागांमध्येही भाजपने विस्तारासाठी लक्ष केंद्रित केल्याचे कळते. त्यापार्श्वभूमीवर इंदरजित यांचा प्रवेश पंजाबमध्ये उपयुक्त ठरेल असा दावा पुरी यांनी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, खासदार दुष्यंत गौतम, आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

loading image
go to top