Helicopter Crash: ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्रकृती गंभीर

प्रकृती गंभीर पण स्थिर असून त्यांना आराम पडावा म्हणून सर्वस्तरांतून प्रार्थना करण्यात येत आहे
varun singh
varun singhANI

कोइमतूर (पीटीआय) : हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुणसिंग यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी बंगळूरमध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. वरुण सिंग यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असून त्यांना आराम पडावा म्हणून सर्वस्तरांतून प्रार्थना करण्यात येत आहे.

वरुण यांच्यावर आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. वृत्तसंस्थेशी बोलताना वरुण यांचे वडील कर्नल के.पी.सिंग (निवृत्त) म्हणाले की,‘‘ मी सध्या वेलिंग्टनमध्ये पोचलो असलो तरीसुद्धा वरुणला मात्र बंगळूरमध्ये हलविण्यात आले आहे.’’ के.पी.सिंग हे मध्यप्रदेशातील भोपाळ येथे वास्तव्यास असतात. वरुण यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘‘ मी याबाबत आताच काहीही खात्रीने सांगू शकत नाही पण यातून देखील तो सावरेल याचा मला विश्वास आहे."

varun singh
बिपीन रावत यांच्यासह इतरांचे पार्थिव नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात

पृथ्वीचे कुटुंब शोकसागरात

आग्रा : हेलिकॉप्टर अपघातामध्ये मरण पावलेले विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाला पारावार राहिलेला नाही. दयाल भाग भागातील सारननगरमध्ये चौहान यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. पृथ्वीच्या कुटुंबीयांनी २००६ साली ग्वाल्हेरमधून आग्रा येथे स्थलांतर केले होते. त्यांचे वडील सुरेंद्रसिंग यांनी बेकरीचा व्यवसाय देखील थाटला होता. पृथ्वीच्या निधनाची बातमी त्यांना वाहिन्यांवरून समजली.

शौर्य चक्राचे मानकरी

सध्या के.पी.सिंग आणि त्यांच्या पत्नी उमा हे दोघेही मुंबईतील लहान मुलाकडे वास्तव्यास असतात. तनूज सिंग हे नौदलामध्ये ले. कमांडर आहेत. या अपघाताची बातमी समजली तेव्हा सिंग पती पत्नी हे मुंबईमध्येच होते. मागील वर्षी ‘तेजस’ च्या उड्डाणादरम्यान देखील वरुणसिंग हे अशाच आणीबाणीच्या स्थितीमध्ये सापडले होते पण त्यातून देखील ते सहीसलामत बाहेर पडले. सरकारने त्यांच्या पराक्रमाचा गौरव करताना त्यांना शौर्यचक्र प्रदान केले होते.

दास यांच्या कुटुंबाला धक्का

भुवनेश्वर : जनरल बिपिन रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टर अपघातामध्ये मरण पावलेल्यांत ओडिशातील हवाई दलाचे अधिकारी राणाप्रताप दास यांचा देखील समावेश होता. कृष्णचंद्रपूर खेड्यात त्यांचे वास्तव्य होते. ते हवाई दलामध्ये ज्युनिअर वॉरंट ऑफिसर होते. मागील बारा वर्षांपासून ते तांत्रिक पथकाचा भाग होते. राणाप्रताप यांच्या पश्चात पत्नी, एक वर्षाचा मुलगा आणि वृद्ध आई वडील आहेत. त्यांच्यावर येथील मूळगावी अंत्यसंस्कार केले जातील.

varun singh
"हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्रकृती गंभीर"

पाणीही मिळू शकले नाही

सरसेनाध्यक्ष रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर ते येथील घनदाट जंगलात कोसळले. हा अपघात अनेकांनी जवळून पाहिला पण कोणीही जनरल रावत यांना ओळखू शकले नाही. या अपघातात एक व्यक्ती खूप गंभीर जखमी झाली होती पण ती जिवंत होती. आमच्याकडे प्यायला पाणी मागत होती पण आम्ही तिला पाणी देऊ शकलो नाही. आम्हाला नंतर समजले की ते बिपिन रावत होते.

जनरल बिपिन रावत हे आमचे मौल्यवान भागीदार आणि भारत अमेरिका सुरक्षासंबंधांचे खंदे समर्थक होते. त्यांच्यामुळेच भारतासोबतचे द्विपक्षीय लष्करी संबंध अधिक बळकट झाले. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहे.

-अँटनी ब्लिंकन, परराष्ट्रमंत्री अमेरिका

जनरल बिपिन रावत हे सच्चे नेते आणि इस्राईलचे जवळचे मित्र होते, त्यांच्या हेलिकॉप्टरला अशा पद्धतीने अपघात होणे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मी मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहे.

- नफ्ताली बेनेट, पंतप्रधान इस्राईल

सरसेनाध्यक्षांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. तसे झाले तरच सत्य समोर येईल. अमेरिकेचे अध्यक्ष जॉन.एफ. केनेडी यांची हत्या झाल्यानंतर तेथील सरन्यायाधीशांनीच चौकशी केली होती. सर्वोच्च न्यायालयात काही न्यायाधीश असे आहेत ज्यांच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही.

- सुब्रह्मण्यम स्वामी, भाजप नेते

दिवसभरात

  • जनरल रावत यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्यांना देशभर श्रद्धांजली

  • संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून जनरल रावत यांना आदरांजली

  • हवाई दलाच्या सुपर हर्क्युलसने तेरा पार्थिव दिल्लीमध्ये आणले

  • केरळ, तमिळनाडू सरकारकडून मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली

  • न्यायवैद्यक पथकाकडून तमिळनाडूतील दुर्घटनास्थळाची पाहणी

  • भारतीय हवाई दलाच्या प्रमुखांकडून दुर्घटनास्थळाला भेट

  • ‘यूएन’च्या सरचिटणीसांकडून हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत शोक व्यक्त

  • अमेरिका आणि इस्राईलकडूनही जनरल रावत यांना श्रद्धांजली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com