इंटरनेटवर 'पॉर्न' पाहण्यात महिलांचे वाढते प्रमाण

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

अश्‍लिल साहित्य पाहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. त्यामध्ये आता महिलांचेही प्रमाण वाढत आहे. एका पॉर्न साईटने जाहीर केलेल्या अहवालात मोबाईलवरून पॉर्न कंटेंट पाहणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.

नवी दिल्ली : अश्‍लिल साहित्य पाहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. त्यामध्ये आता महिलांचेही प्रमाण वाढत आहे. एका पॉर्न साईटने जाहीर केलेल्या अहवालात मोबाईलवरून पॉर्न कंटेंट पाहणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.

पॉर्न कंटेंट देणाऱ्या "पॉर्नहब' नावाच्या संकेतस्थळाने कंटेंट पाहणाऱ्यांचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून मोबाईलवरून पॉर्न पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे.

डेस्कटॉपवरील "विंडोज' ऑपरेटिंग सिस्टीमपेक्षा मोबाईलवरील "ऍड्रॉईड' ऑपरेटिंग सिस्टीमवरून पॉर्न पाहणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे. "विंडोज'वरून पॉर्न पाहणाऱ्यांचे प्रमाण 37.91 टक्के तर "ऍड्रॉईड'वरून हेच प्रमाण 37.93 टक्के एवढे आहे.

पॉर्न पाहणाऱ्या महिलांचे जगभरातील विविध देशांमध्ये वेगवेगळे प्रमाण आहे. भारतासह स्वीडन, अर्जेंटिना, मेक्‍सिको या देशांमध्ये एकूण पॉर्न पाहणाऱ्यांपैकी महिलांचे प्रमाण 30 टक्के आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये "पॉर्नहब' या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांपैकी 72 टक्के जणांनी मोबाईलवरून संकेतस्थळ पाहिले. तर "पॉर्नहब'ला भेट देणाऱ्या महिलांपैकी 80 टक्के महिलांनी मोबाईलवरून भेट दिली होती. तर यामध्ये पुरुषांचे प्रमाण 69 टक्के होते.

महिलांचे सक्षमीकरण आणि पुरुषांएवढेच स्वातंत्र्य या कारणांमुळे लोकशाही असलेल्या देशांमधील महिलांचे प्रमाण वाढत असल्याचा कल दिसून येत आहे.

Web Title: The Growth of Porn Content Consumption on Mobile Devices Is Driven by Women