"जीसॅट 17'चे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

या उपग्रहाचे वजन तब्बल 3,477 किलो असून एरियनच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आलेला हा 21 वा भारतीय उपग्रह आहे. जीसॅट 17 हा "कम्युनिकेशन सॅटेलाईट' असून याचा वापर प्रामुख्याने हवामान क्षेत्रासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी केला जाणार आहे

बंगळूर - "जीसॅट 17' या भारताच्या उपग्रहाचे "एरियन स्पेस' या फ्रान्सच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने आज (गुरुवार) फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

या उपग्रहाचे वजन तब्बल 3,477 किलो असून एरियनच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आलेला हा 21 वा भारतीय उपग्रह आहे. जीसॅट 17 हा "कम्युनिकेशन सॅटेलाईट' असून याचा वापर प्रामुख्याने हवामान क्षेत्रासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी केला जाणार आहे. या उपग्रहाची आयुर्मर्यादा 15 वर्षांची आहे. कर्नाटकमधील हसन येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या विभागाने (मास्टर कंट्रोल फॅसिलिटी) आता या उपग्रहावर नियंत्रण मिळविले आहे.

इस्रोने गेल्या काही वर्षांत केलेल्या असामान्य प्रगतीमुळे अवकाश संशोधन व उपग्रह सेवा क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनामधून इस्रोचे हे यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे.

Web Title: GSAT-17 launched early