'जी सॅट-18' चे यशस्वी प्रक्षेपण; मोदींच्या शुभेच्छा!

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

बंगळूर - भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या (इसओ) अत्याधुनिक अशा "जी सॅट-18‘ या उपग्रहाचे आज (गुरुवार) यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या उपग्रहाचे बुधवारी पहाटे 2 ते 3.15 च्या दरम्यान ÷उड्डाण होणार होते, मात्र हवामानाच्या अडथळ्यामुळे हे उड्डाण 24 तास उशिराने करण्यात आले. फ्रान्समधील कौरो येथून आज उपग्रहाचे यशस्वी उड्डार करण्यात आले. या उपग्रहाचे वजन तीन हजार 404 किलोग्रॅम असून, "जी सॅट-18‘ हा "इस्रो‘कडून सोडला जाणारा विसावा उपग्रह आहे. या अत्याधुनिक उपग्रहाचा भारताच्या माहिती दूरसंचार सेवेला उपयोग होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
"जी सॅट-18‘ चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. " "जी सॅट-18‘ चे यशस्वी उड्डाण केल्याबद्दल इस्रोचे अभिनंदन! आपल्या अवकाश कार्यक्रमासाठी हा आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे‘, अशा शब्दांत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: gsat-18 launched successful