जीएसटी चुकीच्या पद्धतीने आणली : पी. चिदंबरम

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

''सरकारने चुकीची गोष्ट मोठ्या पद्धतीने केली. नोटांबदी किंवा यासारखी मोठी गोष्ट चुकीच्या पद्धतीने आणली. जीएसटीही त्यापैकी एक आहे. जीएसटी व्यावसायिक, ट्रेडर्स, निर्यातदार आणि सामान्य नागरिकांसाठी वाईट गोष्ट बनली आहे''.

- पी. चिदंबरम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होऊन आज एक वर्षपूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने काँग्रेसच्या काही नेत्यांनी यावर भाष्य केले. ''सरकारने चुकीची गोष्ट मोठ्या पद्धतीने केली. नोटांबदी किंवा यासारखी मोठी गोष्ट चुकीच्या पद्धतीने आणली. जीएसटीही त्यापैकी एक आहे. जीएसटी व्यावसायिक, ट्रेडर्स, निर्यातदार आणि सामान्य नागरिकांसाठी वाईट गोष्ट बनली आहे'', अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केली.

त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले, की ''आज रात्री बारा वाजता जीएसटीला एक वर्ष पूर्ण झाली. लाखो व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांसाठी जीएसटी आणण्यात आली. जीएसटीला 'गब्बर सिंग टॅक्स'पेक्षा 'खरा आणि साधा कर' आहे, असे वाटत नाही. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी सांगितले, की आज 1 जुलै प्रत्येक भारतीयांनी दोन मिनिटे शांत राहून भारतीय अर्थशास्त्रासाठी प्रार्थना करावी. 

Web Title: GST come with bad way says P Chidambaram