जीएसटी संकलन जुलैमध्ये 

पीटीआय
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन जुलै महिन्यात वाढले असून, ते 96 हजार 483 कोटी रुपये झाले आहे. जून महिन्यात जीएसटी संकलन 95 हजार 610 कोटी रुपये झाले होते. 

नवी दिल्ली (पीटीआय) : वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन जुलै महिन्यात वाढले असून, ते 96 हजार 483 कोटी रुपये झाले आहे. जून महिन्यात जीएसटी संकलन 95 हजार 610 कोटी रुपये झाले होते. 

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये 'जीएसटीआर 31बी' विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या वाढली असून, ती 66 लाखांवर पोचली आहे. त्याआधीच्या जून महिन्यात ही संख्या 64.49 लाख होती. जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 96 हजार 483 कोटी रुपये आहे. यात केंद्र जीएसटी 15 हजार 877 कोटी, राज्य जीएसटी 22 हजार 293 कोटी, एकात्मिक जीएसटी 49 हजार 951 कोटी आणि उपकर 8 हजार 362 कोटी रुपये (आयातीवर 794 कोटी रुपये) यांचा समावेश आहे. जुलैमधील संकलन अपेक्षेएवढे झाले आहे. 
एप्रिल ते मे या कालावधीत राज्यांना 3 हजार 899 कोटी रुपये जीएसटी भरपाई म्हणून देण्यात आले आहेत. नुकतीच 88 वस्तूंवरील जीएसटीमध्ये कपात करण्यात आली होती. याचा परिणाम संकलनावर झालेला दिसून आलेला नाही. वॉशिंग मशिन, फ्रिज, मिक्‍सर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू तसेच, एक हजार रुपयांपर्यंतची पादत्राणे, रंग, व्हॅर्निश आणि सॅनिटरी नॅपकिन्स यावरील जीएसटीमध्ये 27 जुलैपासून कपात करण्यात आली आहे. 

Web Title: GST compilation in July