जूनमध्ये "जीएसटी'तून 95 हजार 610 कोटींचा महसूल 

पीटीआय
सोमवार, 2 जुलै 2018

वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) जून महिन्यात 95 हजार 610 कोटींचा महसूल मिळाला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मे महिन्याच्या तुलनेत जीएसटी उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 64 लाख 69 हजार जीएसटी रिटर्न फाइल करण्यात आले. बोगस बिलांचे व्यवहार रोखल्यास "जीएसटी' उत्पन्नात नक्की वाढ होईल, असा विश्‍वास महसूल सचिव हसमुख अधिया यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) जून महिन्यात 95 हजार 610 कोटींचा महसूल मिळाला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मे महिन्याच्या तुलनेत जीएसटी उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 64 लाख 69 हजार जीएसटी रिटर्न फाइल करण्यात आले. बोगस बिलांचे व्यवहार रोखल्यास "जीएसटी' उत्पन्नात नक्की वाढ होईल, असा विश्‍वास महसूल सचिव हसमुख अधिया यांनी व्यक्त केला.

जीएसटी अंमलबजावणी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारकडून जीएसटी दिवस साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जूनमधील एकूण जीएसटीमध्ये केंद्रीय कर (सीजीएसटी) 15 हजार 968 कोटी, राज्याचा कर (एसजीएसटी) 22 हजार 21 कोटी, एकात्मिक कर (आयजीएसटी) 49 हजार 498 कोटी आणि अधिभार (सेस) 8 हजार 122 कोटी मिळाले असल्याचे महसूल खात्याने म्हटले आहे. मे महिन्यात जीएसटीतून सरकारला 94 हजार 16 कोटींचा महसूल मिळाला होता. दरमहा एक लाख कोटींचा महसूल हा नियम नाही, मात्र त्या उद्दिष्टापर्यंत पोचण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितले. 

Web Title: GST coolection of june month 95 thousand 610 cr