जीवनावश्‍यक औषधे महागणार

पीटीआय
बुधवार, 14 जून 2017

नवी दिल्ली PTI वस्तू व सेवा कराची(जीएसटी) अंमलबजावणी पुढील महिन्यात होत असून, या कररचनेत जीवनावश्‍यक औषधांच्या किमती 2.29 टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार आहेत. बहुतांश जीवनावश्‍यक औषधांवर सध्या असलेला 9 टक्के कर सरकारने जीएसटीमध्ये 12 टक्‍क्‍यांवर नेला आहे.

नवी दिल्ली PTI वस्तू व सेवा कराची(जीएसटी) अंमलबजावणी पुढील महिन्यात होत असून, या कररचनेत जीवनावश्‍यक औषधांच्या किमती 2.29 टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार आहेत. बहुतांश जीवनावश्‍यक औषधांवर सध्या असलेला 9 टक्के कर सरकारने जीएसटीमध्ये 12 टक्‍क्‍यांवर नेला आहे.

जीएसटीमध्ये इन्सुलिनसह काही निवड जीवनावश्‍यक औषधांवरील कर 12 टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांवर आणण्याचा प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. मात्र, जीएसटीमध्ये हेपॅरीन, वॉरफॅरीन, डिलटायझम, डायझेपाम, आयब्युप्रोफेन, प्रोप्रॅनोलोल, इमॅटिनीब यासारख्या जीवनावश्‍यक औधषांवर 12 टक्के कर असेल. राष्ट्रीय औषधे दर प्राधिकरणाने (एनपीपीए) अधिसूचित औषधांच्या कमाल किमतीची सुधारित यादी नुकतीच जाहीर केली आहे. या किमती जीएसटीनुसार आहेत. अधिसूचित औषधांचा उत्पादन शुल्क माफ आहे. मात्र, आता जीएसटी लागू करण्यात आला आहे. बिगरअधिसूचित औषधांबाबत 'एनपीपीए'ने म्हटले आहे, की जीएसटीमध्ये कर वाढणार असल्याने औधषांच्या किमतीत वाढ होणार आहे. औषधांच्या किमतीत दहा टक्‍क्‍यांच्या ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वाढ होत असेल तर त्याचा बोजा कंपन्यांना सहन करावा लागेल.

इन्सुलिनसारख्या औषधांवरील दर 12 टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. यामुळे कंपन्यांना या औषधांच्या किमती कमी कराव्या लागतील. जीएसटीमध्ये नफेखोरी प्रतिबंधक तरतूद असल्यामुळे कमी झालेल्या दराचा फायदा औषध कंपन्यांना ग्राहकांपर्यंत पोचवावा लागेल.

जीएसटीची अंमलबजावणी सुरळीतपणे होईल, असा मला विश्‍वास आहे. जीएसटीमुळे देशातील औषधांच्या उपलब्धततेत कोणताही मोठी समस्या निर्माण होणार नाही.
- भूपेंद्र सिंह, अध्यक्ष, एनपीपीए

Web Title: gst medical price india news new delhi marathi news