जीएसटी प्रस्तावामुळे महागाई वाढणार!

काँग्रेसचा भाजप सरकारवर हल्लाबोल
Inflation
Inflation Sakal

नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या वापरातील वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा प्रस्ताव महागाई वाढविणारा असल्याचा आरोप करून काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले. सध्या पाच टक्के जीएसटी श्रेणीत असलेल्या १४३ पैकी ९२ टक्के वस्तू १८ ते २८ टक्क्यांच्या श्रेणीत आणण्याचा प्रस्ताव जीएसटी परिषदेसमोर आहे.

काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी म्हणाले, की जीएसटी वाढविण्याच्या प्रस्तावांतर्गत येणाऱ्या १४३ वस्तूंमध्ये गूळ, पापड, चष्मा, पादत्राणे यासारख्या गोष्टींसह ३२ इंचापेक्षा कमी आकाराचे टीव्ही, यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या परिषदेच्या बैठकीतील निर्णयानंतर बहुतांश वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांच्या श्रेणीतून पाच ते १८ टक्क्यांच्या श्रेणीत आणला होता. असे असताना पुन्हा त्यात वाढ केली जात आहे. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर असून त्यात वाढ करण्याचा निर्णय जनतेची क्रूर थट्टा करणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com