जीएसटी प्रणालीला एक वर्ष पूर्ण

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

एक देश एक कर'चे आश्‍वासन देत केंद्र सरकारने देशभरात 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू केला. या अंमलबजावणीला उद्या रविवारी एक वर्ष पूर्ण होत असून, यानिमित्त सरकारने जीएसटी दिवस म्हणून साजरा करण्याची तयारी केली आहे. सरकारने जीएसटी डे दणक्‍यात साजरा करण्याची तयारी केली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्थमंत्री पीयूष गोयल राहणार असून, अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

नवी दिल्ली : "एक देश एक कर'चे आश्‍वासन देत केंद्र सरकारने देशभरात 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू केला. या अंमलबजावणीला उद्या रविवारी एक वर्ष पूर्ण होत असून, यानिमित्त सरकारने जीएसटी दिवस म्हणून साजरा करण्याची तयारी केली आहे. सरकारने जीएसटी डे दणक्‍यात साजरा करण्याची तयारी केली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्थमंत्री पीयूष गोयल राहणार असून, अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्‍ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

30 जून 2017 च्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मोठा सोहळा आयोजित करून देशभरात जीएसटी करप्रणाली लागू केली होती. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जीएसटी हा केंद्र सरकारचा मोठा निर्णय होता. भारतात किचकट करप्रणालीत सुसूत्रता आणण्याचे काम जीएसटी करप्रणालीने केले आहे. जीएसटीने सुमारे एक डझनभर अप्रत्यक्ष करांची जागा घेतली आहे. मात्र ही प्रक्रिया खूपच किचकट आणि लांबली होती. वर्षभराचा आढावा घेतल्यास सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केला तर अनेक ठिकाणी जीएसटीत वाढही केली. एकीकडे एका पक्षाने स्वागत केले असून दुसरीकडे विरोधही झाला आहे. जीएसटीचा निर्णय ही केंद्र सरकारची मोठी चूक असल्याचे विरोधक सातत्याने सांगत आहेत. सुमारे दोन दशकापेक्षा अधिक काळानंतर 1 जुलै 2017 रोजी देशाला नवीन करप्रणाली मिळाली. 

Web Title: GST system completed one year