जीएसटी प्रामाणिकपणाचा विजय : पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 24 जून 2018

पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात जीएसटीसह अन्य महत्वपूर्ण बाबींवर आपले मत व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी आजच्या (रविवार) 'मन की बात'मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याचाही गौरव केला.

नवी दिल्ली : विक्री आणि सेवा कराला (जीएसटी) लवकरच एक वर्ष पूर्ण होत आहे. एक देश, एक टॅक्‍स देशात लागू झाला आहे. त्यामुळे याचा मला निश्‍चितपणे आनंद आहेच. याशिवाय लोकांचे स्वप्त पूर्ण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये सांगितले. तसेच जीएसटी हा प्रामाणिकपणाचा विजय आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात जीएसटीसह अन्य महत्वपूर्ण बाबींवर आपले मत व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी आजच्या (रविवार) 'मन की बात'मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याचाही गौरव केला. ते म्हणाले, की 23 जूनला मुखर्जी यांची पुण्यतिथी होती. त्यांनी शिक्षण, व्यवस्थापन आणि संसदीय कामकाजात खूप मोठे कार्य केले. खूप कमी लोकांना माहित आहे, की ते कमी वयात कोलकात्ता विश्व विद्यालयाचे कुलगुरू बनले होते. योगाचे महत्त्व, जालियनवाला बाग तसेच 'डॉक्‍टर डे'चाही मोदी यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. 

Web Title: GST is victory of honesty says PM Modi