गोड गोड पेरू शरीराचे रक्षण करी! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाळा सुरू झाला की गोड पेरू बाजारात दिसू लागतात. गोड-तुरट चवीचे पेरू दिसायलाही आकर्षक असतात. ताजे-हिरवे पेरू पाहून तोंडाला पाणी सुटतेच. पेरू खाणे हे आरोग्यासाठीही चांगले आहे. यातून "सी' जीवनसत्त्व मिळते. पेरूमुळे शरीरातील "इलेक्‍ट्रोलाइट'नावाचा द्रव व सोडियमचे संतुलन योग्य राहत असल्याने थकवा दूर होऊन झोपही व्यवस्थित होते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

उच्च ऊर्जा मिळणाऱ्या फळांमध्ये पेरूचा समावेश होतो. आहारतज्ज्ञांनुसार पेरू म्हणजे जीवनसत्त्व आणि खनिजाची खाण आहे. शरीरासाठी पोषक सर्व जीवनसत्त्व व खनिजे 100 ग्रॅम वजनाच्या एका पेरूत सामावलेली असतात. शरीरातील कोशिका आणि "डीएनए'साठी आवश्‍यक "बी-9' जीवनसत्त्व, पोटॅशियम, मॅग्नेशियम पेरूत असते. शरीरातील सोडियम व इलेक्‍ट्रोलाइट नावाच्या द्रव पदार्थाचे संतुलन पोटॅशियमने राखले जाते. एखाद्याच्या शरीरात इलेक्‍ट्रोलाइटचे प्रमाण कमी झाल्यास थकवा जाणवतो. पेरू खाल्ल्याने पोटॅशियम शरीराला मिळते. मांसपेशी व हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पोटॅशियम, मॅग्नेशियम उपयुक्त असते. पेरूच्या सेवनाने अनेक आजारांना दूर ठेवता येते. यातील "क' जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिबंधक शक्‍ती वाढते. 

पेरूचे फायदे 
- नियमित सेवनाने सर्दी-पडशापासून बचाव 
- रक्तदाब नियंत्रित राहतो 
- बीटा केरोटीनमुळे त्वचारोग दूर 
- डाएट करणाऱ्यांना लाभदायक 

पेरूतील पोषणमूल्य (प्रति 100 ग्रॅममध्ये) (आकडे मिलिग्रॅममध्ये) 
14.32 
कार्बोहाइड्रेट 

8.92 
साखर 

228.3 
"क' जीवनसत्त्व 

40 
फास्फोरस 

417 
पोटॅशियम 

8.15 
मॅग्नेशियम 

Web Title: guava protect for health