लग्नात जेवण आवडले नाही म्हणून फोडले हॉटेल

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

जनकपुरीतील पिक्काडिली भागात हे हॉटेल आहे. जनकपुरी कनेक्ट नावाच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : लग्न समारंभात हॉटेलने ठेवलेले जेवण न आवडल्याने नातेवाईकांकडून हॉटेलची तोडफोड केल्याची घटना दिल्लीत घडली आहे.

दिल्लीतील जनकपुरी भागातील एका हॉटेलमध्ये लग्नात जेवण न आवडल्याने नातेवाईक हॉटेल कर्मचाऱ्यांशी भिडले. यामध्ये कर्मचाऱ्यांना जोरदार मारहाण करण्यात आली, तसेच नातेवाईकांना एवढ्यावरच न थांबता हॉटेलची तोडफोड करत चित्रच बदलले. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये दोन्ही बाजूकडून राडा सुरु असल्याचे दिसत आहे.

जनकपुरीतील पिक्कॅडली भागात हे हॉटेल आहे. जनकपुरी कनेक्ट नावाच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guests didnt liked the food wedding beat up hotel staff in Delhi