राजकीय नेत्यांचे महागुरू 

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

भय्यूजी महाराज अर्थात उदयसिंह देशमुख हे राजकीय नेत्यांचे गुरू म्हणून ओळखले जात असत. ते 2016 मध्ये एका कार अपघातात जखमी झाल्यानंतर रथी महारथी नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याने ते चर्चेत आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती.

इंदूर - भय्यूजी महाराज अर्थात उदयसिंह देशमुख हे राजकीय नेत्यांचे गुरू म्हणून ओळखले जात असत. ते 2016 मध्ये एका कार अपघातात जखमी झाल्यानंतर रथी महारथी नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याने ते चर्चेत आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मध्यप्रदेश सरकारने त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता पण त्यांनी तो नाकारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विलासराव देशमुख, प्रतिभा पाटील, उद्धव आणि राज ठाकरे, लता मंगेशकर आणि आशा भोसले हे नेहमी भय्यूजी महाराज यांच्या इंदूरमधील आश्रमाला भेटी देत असत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या "सद्‌भावना उपोषणा'च्या समाप्तीला भय्यूजी महाराज उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. "यूपीए' सरकारने 2011 मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनात मध्यस्थी करण्यासाठी त्यांची मदत घेतली होती. 
 

Web Title: Guide of political leaders