
Gujrat News : PM मोदींच्या गृहराज्यातील ५६० मच्छीमार पाकच्या तुरुंगात बंद; सरकारनेच दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभेत माहिती देताना गुजरात सरकारने सांगितले की, गुजरातमधील 560 मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात बंद आहेत. या मच्छिमारांनी चुकून सीमा ओलांडली होती आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराने पकडले होते.
याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. याला उत्तर देताना गुजरातचे मत्स्यव्यवसाय मंत्री राघवजी पटेल म्हणाले की, ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत गुजरातमधील एकूण ५६० मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.
मंत्र्यांनी माहिती दिली की यापैकी २७४ हे मागील दोन वर्षात पकडले गेले आहेत, ते म्हणाले की २०२१ मध्ये गुजरातमधील १९३ मच्छिमार पाकिस्तानने पकडले होते. तर २०२३ मध्ये ८१ मच्छिमार पाकिस्तानने पकडले होते. गेल्या दोन वर्षांत ५५ भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानने सुटका केली आहे. त्यापैकी २० मच्छिमारांची 2021 मध्ये तर 2022 मध्ये 35 मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती.
पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या ३२३ मच्छिमारांच्या कुटुंबांना गुजरात सरकारने प्रतिदिन ३०० रुपयांची मदत दिली जात आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सन २०२१ मध्ये ३०० कुटुंबांना ही आर्थिक मदत देण्यात आली तर २०२२ मध्ये ४२८ कुटुंबांना ही आर्थिक मदत देण्यात आली.
पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सीच्या बोटी आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ गस्त घालत असतात. भारतीय मच्छिमार चुकून सीमा ओलांडताच त्याला पकडतात. पाकिस्तानचे मच्छिमार देखील चुकून सीमा ओलांडून येतात. ज्यांना भारतीय यंत्रणांनी अटक केली आहे. सहसा मच्छीमार मोठ्या प्रमाणात मासे पकडण्याच्या लालसेने चुकून सीमा ओलांडतात.