70 वर्षीय वृद्धेची बिबट्याच्या पिंजऱ्यातून सुटका

वृत्तसंस्था
शनिवार, 29 डिसेंबर 2018

तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यातील भनावाडी गावाबाहेर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. गुरुवारी रात्री पमानीबेन चौधरी या गुडघा दुखत असल्याने व्यारा येथे उपचारासाठी गेल्या होत्या. जावयाबरोबर रुग्णालयात गेल्यानंतर काही कागदपत्रे आणण्यासाठी ते घरी आले होते. पुन्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना पमानीबेन रुग्णालयात नसल्याचे दिसले आणि त्यांना सगळीकडे शोध घेतला पण त्यांना त्या सापडल्या नाहीत.

अहमदाबाद : गुजरातमधील तापी जिल्ह्यात बिबट्याच्या पिंजऱ्यात अडकलेल्या 70 वर्षीय वृद्धेची सुखरुप सुटका करण्यात आली.

तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्यातील भनावाडी गावाबाहेर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता. गुरुवारी रात्री पमानीबेन चौधरी या गुडघा दुखत असल्याने व्यारा येथे उपचारासाठी गेल्या होत्या. जावयाबरोबर रुग्णालयात गेल्यानंतर काही कागदपत्रे आणण्यासाठी ते घरी आले होते. पुन्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना पमानीबेन रुग्णालयात नसल्याचे दिसले आणि त्यांना सगळीकडे शोध घेतला पण त्यांना त्या सापडल्या नाहीत. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांच्या गावापासून दोन किमी अंतरावर बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात त्या सापडल्या. 

त्यांच्याबाबतीत घडले असे, की गुडघा दुखत असल्याने डॉक्टर इंजेक्शन देतील या भीतीने त्या तेथून पळाल्या. गावाकडे येत असताना त्यांनी भीतीपोटी पिंजऱ्यात लपण्याचा निर्णय घेतला. रात्रभर पिंजऱ्यात राहून सकाळी गावी जावे असे त्यांना ठरविले. पण, सकाळी उठल्यानंतर त्यांना पिंजऱ्याचा दरवाजाच उघडेना. अखेर एका शेतकऱ्याने त्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.

Web Title: Gujarat 70-yr-old woman rescued after being trapped in leopard cage