Gujarat Assembly Election : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Election Voting

Gujarat Assembly Election : दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या

अहमदाबाद : गुजरातमधील ९३ मतदारसंघांतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता.५) पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील ८९ जागांसाठीचे पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरलाच पार पडले होते. पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी ६३.३१ टक्के मतदान झाले होते.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि ‘आप’प्रमाणेच काही प्रादेशिक पक्षही स्वतःचे भवितव्य आजमावत आहेत. उत्तर आणि मध्य गुजरातमधील १४ जिल्ह्यांत दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडेल. यामध्ये अहमदाबाद, बडोदा आणि गांधीनगर आदी महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोदिया हा मतदारसंघ आणि भाजपच्या उमेदवारीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्या विरामगम आणि आणि अल्पेश ठाकोर यांच्या दक्षिण गांधीनगर मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दुसरा टप्पा

  • ९३ - जागा

  • ८३३ - उमेदवार

  • ६० - पक्ष