Board Exam Result : शाळेत शिपाई असलेल्या वडिलांनी मुलासोबत दिली बोर्डाची परिक्षा; दोघेही झाले पास!

Gujarat Board Exam Result (Photo Indian Ecpress)
Gujarat Board Exam Result (Photo Indian Ecpress)

Board Exam Result : मुलगा ज्या शाळेत शिकतो त्या शाळेत शिपायाची नोकरी करणाऱ्या बापाने पोरासोबत नाव कमावले आहे. शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नसते हे वीरभद्र सिसोदिया यांनी सिद्ध केलं आहे. वीरभद्र नवा वदज येथील डीपी हायस्कूल येथे शिपायाची नोकरी करतात त्याच शाळेत युवराज विद्यार्थी आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये राहणाऱ्या सिसोदिया कुटुंबासाठी गुरुवार दुहेरी आनंदाचा दिवस ठरला. गुजरात बोर्डाने १०वीचा निकाल जाहीर केला. यामध्ये सिसोदिया कुटुंबातील पिता-पुत्र या दोघांनी मिळून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.

गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ( GSHSEB ) गुरुवारी दहावीचा निकाल जाहीर केला. यामध्ये दोघेही चांगल्या गुणांसह पास झाले आहेत.

वीरभद्र सिंग सिसोदिया (४२) आणि त्यांचा मुलगा युवराज (१६) गुजरात बोर्ड हायस्कूल परीक्षेत एकत्र बसले होते. गुरुवारी निकाल जाहीर झाला तेव्हा वीरभद्रला ४५ टक्के तर युवराजला ७९ टक्के गुण मिळाले. युवराज नियमित विद्यार्थी म्हणून परीक्षेला बसला, तर त्याच्या वडीलांनी बाह्य विद्यार्थी म्हणून परिक्षा दिली. गुजरात बोर्डाने मार्चमध्ये दहावीची परीक्षा घेतली होती, ज्याचा निकाल आज जाहीर झाला आहे.

Gujarat Board Exam Result (Photo Indian Ecpress)
MS Dhoni IPL 2023 : तर मला कोणताही संघ खरेदी करणार नाही... धोनीचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

बाप लेकांनी परिक्षेची एकत्र तयारी केली आणि यशाला गवसनी घातली. युवराज म्हणाला, "आम्ही दोघांनी मिळून परीक्षेची तयारी केली होती. मी माझ्या वडिलांना मित्र म्हणून मदत केली." तर वीरभद्र म्हणाले, "माझा मुलगा मला परीक्षा देण्यासाठी प्रेरणा ठरला. मी तब्बल २५ वर्षांनी परीक्षा दिली आहे." (ताज्या मराठी बातम्या)

"इतक्या वर्षांनी पुन्हा परीक्षा देईन, असे कधीच वाटले नव्हते किंवा नियोजनही केले नव्हते. पण जेव्हा माझा मुलगा १०वीपर्यंत पोहोचला तेव्हा मला वाटलं की मीही हे करू शकतो. मग मला शाळेची मदत मिळाली आणि मी परीक्षेचा फॉर्म भरला". वीरभद्रने १९९८ मध्ये शेवटची दहावीची परीक्षा दिली. त्यावेळी ते मूळ राजस्थानातील डुंगरपूर येथे राहत होते.

Gujarat Board Exam Result (Photo Indian Ecpress)
समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्या लोकार्पण; शिर्डी-भरवीर ८० किमी मार्ग सुरू होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com