मेहसाणा (गुजरात): एका महिला पोलिसाने एका गाण्यावर पोलिस चौकीतच ठुमके लगावले. TikTok वर तयार करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिला पोलि कर्मचाऱ्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस टीक-टॉकचे वेड वाढत चालले आहे. अनेकजण विविध ठिकाणांवरून टीक-टॉक व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करतात. या व्हिडिओंमुळे काही जण चर्चेत येतात तर काही जणांवर निलंबणाची कारवाई होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तेलंगणामध्ये सरकारी कार्यालयामध्ये महिला कर्मचाऱयाने व्हिडिओ केला होता, मोठ्या प्रमाणात तो व्हायरलही झाला होता. मात्र, कार्यालयीन वेळेत व जागेत हा व्हिडिओ केल्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागले.
गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील लागनज पोलिस चौकीमधील अर्पिता चौधरी या महिला पोलिस कर्मचाऱ्याने स्टेशनमध्ये ठुमके लगावले. संबंधित व्हिडिओ काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, ही घटना वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर महिला पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हा व्हिडिओ 20 जुलै रोजीचा आहे.
दरम्यान, पोलिस अधिकारी मनजिता वंजारा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अर्पिता चौधरी यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं सिद्ध झाल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.