PM Modi Degree: पंतप्रधान मोदींच्या पदवीचा नाद केजरीवालांना महागात; गुजरात न्यायालयाने आता...

केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या पदवीवर प्रश्न उपस्थित केले होते.
PM Modi Degree
PM Modi DegreeSakal

PM Modi Degree: अहमदाबादच्या न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आप नेते संजय सिंह यांना समन्स बजावले आहे. मानहानीच्या प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे.

गुजरात विद्यापीठाने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, केजरीवाल आणि संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्द्यावरून विद्यापीठाविरोधात अपमानास्पद विधाने केली आहेत.

गुजरात विद्यापीठाने तक्रार दाखल केली :

गुजरात विद्यापीठाचे कुलसचिव पीयूष पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसीच्या कलम 500 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत आणि ट्विटर हँडलवर विद्यापीठाविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

यामुळे प्रतिष्ठित संस्थेची प्रतिमा खराब झाली आहे. ज्यावर अहमदाबाद न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयेशभाई चौवटिया यांनी शनिवारी केजरीवाल आणि संजय सिंह यांना समन्स बजावून 23 मे रोजी हजर राहण्यास सांगितले.

तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितले की, 'गुजरात विद्यापीठाची स्थापना 70 वर्षांपूर्वी झाली असून लोकांमध्ये त्याची प्रतिष्ठा आहे. या आरोपांमुळे लोकांमध्ये विद्यापीठाची विश्वासार्हता ढासळली आहे.

केजरीवाल म्हणाले होते की 'जर पदवी आहे आणि ती बरोबर आहे तर ती का दिली जाऊ शकत नाही?' केजरीवाल यांनी आरोप केला आहे की, 'ती पदवी बनावट असू शकते म्हणून देत नाही'.

PM Modi Degree
Bankruptcy: देशातील सर्वात मोठी रिटेलर कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत अंबानी-अदानी, NCLT ने...

पंतप्रधानांनी दिल्ली विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठात शिक्षण घेतले असेल, तर गुजरात विद्यापीठाने आपला विद्यार्थी देशाचा पंतप्रधान झाल्याचा आनंद साजरा करायला हवा.

संजय सिंह म्हणाले की, 'पंतप्रधानांची बनावट पदवी खरी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे.' न्यायालयाच्या चौकशीदरम्यान चार साक्षीदारही हजर करण्यात आले.

गुजरात विद्यापीठाच्या वकिलांनी सांगितले की, या विधानांमुळे विद्यापीठ बनावट पदव्या जारी करत असल्याचा संदेश गेला आहे.

PM Modi Degree
पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com