यंदाच्या दिवाळीत होणार सोनेरी मोदींची पूजा

यंदाच्या दिवाळीत होणार सोनेरी मोदींची पूजा

धनत्रयोदिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते. या दिवशी काही लोक सोन्याची आभूषणे खरेदी करतात तर, विशेषतः व्यापारी लोक लक्ष्मी-गणेशाची प्रतिमा असलेली सोन्याची बिस्किटे खरेदी करतात. या सोन्याच्या आभूषणांची किंवा बिस्किटांची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी पूजन केले जाते. दिवाळी सणात सोन्याची जास्तीती असत विक्री व्हावी यासाठी ज्वेलर्स देखील नवनवीन कलेक्शन सादर करत असतात. सुरत येथील ज्वेलर्सनी देखील असाच एक नवीन दागिना तयार केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय झाला आहे. याचे कारण म्हणजे सुरत मधील एका सराफाने यंदा मोदी आणि दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा असलेली चांदी व सोन्याची बिस्किटे विक्रीसाठी आणली आहेत आणि ग्राहकांमध्ये ती खूपच लोकप्रिय झाली आहेत.

सुरत येथील एका ज्वेलरने नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेली 10 ग्रॅमपासून ते 1 किलो वजनापर्यंतची चांदी व सोन्याची बिस्किटे बाजारात आणली आहेत. सुरत मधील एका ग्राहकाने मोदी आम्हाला भगवान स्वरूप आहेत असे सांगून यंदा यांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी खरेदी करून त्याची पूजा करणार असल्याची भावना व्यक्त केली. अर्थात यापूर्वीही मोदी यांची प्रतिमा असलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या राख्या रक्षाबंधनाच्या निमित्त बाजारात आल्या होत्या आणि त्यांचीही धडाक्याने विक्री झाली होती.

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या मागणीत वाढ होऊन मागील सहा वर्षांच्या तुलनेत सोन्याची किंमती सर्वोच्च पातळीवर पोचली आहे. मुंबई सराफ बाजारात शुद्ध सोन्याचे दर 33,262 तर, स्टॅंडर्ड सोने 31,110 प्रति तोळा व्यवहार करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com