'सिंह' वापरले म्हणून मागासवर्गीय तरुणाला मारहाण

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

मागासवर्गीय समाजातील (ओबीसी) एका व्यक्तीला नावामध्ये 'सिंह' वापल्याच्या कारणावरून येथील जमावाने मारहाण केली. या दलित व्यक्तीला उच्चवर्गातील समाजातील लोकांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे.

पलाणपूर : मागासवर्गीय समाजातील (ओबीसी) एका व्यक्तीला नावामध्ये 'सिंह' वापल्याच्या कारणावरून येथील जमावाने मारहाण केली. या दलित व्यक्तीला उच्चवर्गातील समाजातील लोकांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. मागील दोन आठवड्यात होणारी ही तिसरी घटना आहे. ही घटना गुजरातमधील बनास्कांथा जिल्ह्यातील उन गावात काल (शनिवार) घडली.

हिमतसिंह चौहान हा 20 वर्षीय तरूण कोळी ठाकोर समाजातील असून, तो मागासवर्गीय समाजातील आहे. त्याने त्याच्या नावामध्ये सिंह हे नाव लावल्याचे त्याच्या फेसबुकच्या अकाऊंटवर समजले. त्यामुळे उच्चवर्गीय दरबार समाजातील संतप्त जमावाने हिमतसिंह चौहानला मारहाण केली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात भारतीय दंडसंहिता कलम 394, 396 आणि कलम 506 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती थारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ए. के. भरवाड यांनी दिली. 

याबाबत भरवाड यांनी सांगितले, की चौहान याच्या फेसबुक अकाऊंटवर त्याच्या नावामध्ये हिमतसिंह हे नाव असल्याचे पाहिले. सिंह हे नाव त्याने स्वत:हून टाकले. त्यामुळे ही बाब दरबार समाजातील लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हिमतसिंह चौहान यास मारहाण केली. याप्रकरणी आम्ही सहा जणांना अटक केली आहे. 

Web Title: Gujarat Dalit man beaten by goons for using Sinh in name