Gujarat Election: निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का! माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Legislative Assembly Election 2022

Gujarat Election: निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का! माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Gujarat Legislative Assembly Election 2022: गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच महिन्याच्या सुरुवातील भाजपला सोडचिठ्ठी दिलेले एका माजी मंत्र्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Jay Narayan Vyas

गुजरामध्ये सध्या भाजप, काँग्रेस आणि आप या पक्षांकडून ताकद लावली जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून आश्वासन देण्यात येत आहेत. यातच जय नारायण व्यास नावाचे भाजपचे माजी मंत्री अहमदाबाद येथील काँग्रेस कार्यालयात दाखल झाले. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हेही वाचाः काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

जय नारायण व्यास हे मागील अनेक वर्षांपासून भाजपसोबत होते. पक्षातील अनेक चढ-उतार त्यांनी बघितलेले आहेत. जेव्हा केशुभाई आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा जय नारायण व्यास हे दोन्ही सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत.