पाकिस्तानी झेंडा तुडवून केली घोषणाबाजी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

या प्रकरणी गुजरात पोलिसांनी युवकांविरोधात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी आणि भारतीय रस्त्यांवर पाकिस्तानचा झेंडा रंगकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदाबाद - पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याच्या घटनेनंतर गुजरातमधील आनंद येथील नागरिकांनी पाकिस्तानचा झेंड्याचे चित्र रस्त्यावर रंगकाम करत पाकविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आनंदमधील नागरिकांनी देशभक्तीचे प्रतीक दाखवत पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर रंगविला. त्या झेंड्यावर उभे राहून युवकांनी पाकिस्तानविरुद्ध घोषणाबाजी केली. पाकिस्तानी सैन्याच्या नापाक कृतीचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. या युवकांनी वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला.

या प्रकरणी गुजरात पोलिसांनी युवकांविरोधात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी आणि भारतीय रस्त्यांवर पाकिस्तानचा झेंडा रंगकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Gujarat locals paint Pakistan flag on road to protest against mutilation of soldiers, police register case