मोदींनी चहा विकलेल्या स्टेशनचा होणार विकास

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील​ वडनगर हे मोदींचे जन्मठिकाण असून, याठिकाणी ते वडीलांसह चहा विकत होते.

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकलेल्या गुजरातमधील वडनेरा स्टेशनच्या विकासासाठी आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर स्टेशनवर मोदी चहा विकत होते. मोदींची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर हे रेल्वे स्टेशन आणखी प्रकाशझोतात आले होते. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी या स्टेशनच्या विकासासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

सचाना गावातील इन्लँड कंटेनर डेपोच्या उद्घाटनासाठी सिन्हा आले होते. यावेळी त्यांनी स्टेशनच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी मंजूर केला. लवकरच या स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. वडनगर हे मोदींचे जन्मठिकाण असून, याठिकाणी ते वडीलांसह चहा विकत होते.

Web Title: gujarat railway station where modi sold tea gets eight crore for development work