12 सिंहांच्या गराड्यात तिने दिला बाळाला जन्म

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

रेल्वे स्टेशनवर, विमानात किंवा मोटारीत महिलेचे प्रसुती झाल्याच्या घटना सतत घडत असतात. पण, गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील लुंसापूर गावातील मंगूबेन मकवाना या 32 वर्षीय महिलेची महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली.

राजकोट - गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील 32 वर्षांची महिला 29 जूनची गीर अभयारण्यातील भयानक रात्र कधीही विसरू शकत नाही. कारणही तसेच आहे, तिने चक्क 12 सिंहांनी रुग्णवाहिकेला घेरले असताना बाळाला जन्म दिला. 

रेल्वे स्टेशनवर, विमानात किंवा मोटारीत महिलेचे प्रसुती झाल्याच्या घटना सतत घडत असतात. पण, गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील लुंसापूर गावातील मंगूबेन मकवाना या 32 वर्षीय महिलेची महिलेची प्रसुती चक्क सिंहाच्या कळपामध्ये झाली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. त्या महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलवली. नंतर तिला रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेत असताना गावापासून 3 किमी अंतरावर सिंहाच्या कळपाने रुग्णवाहिकेला घेरले. त्या सिंहाच्या कळपात अंदाजे 12 सिंह होते. 

108 क्रमांकाच्या इमरजन्सी रुग्णवाहिका सेवेच्या अमरेली जिल्हा प्रमुख चेतन गढिया यांनी सांगितले, की आम्ही रुग्णवाहिका थांबवून त्या सिंहांना हटविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फायदा झाला नाही. कारण सिंहाचा तो कळप तिथून हालायचा तयारीत नव्हता. त्याचवेळी महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्याने रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी फोनवरून संपर्क केला आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊन 25 मिनिटांमध्ये त्या महिलेची प्रसुती करण्यात आली.

गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. महिलेची रुग्णवाहिकेत प्रसुती सुरू असताना समोर असलेले सिंह पूर्णवेळ गाडीभोवती फिरत होते. नवजात बाळाला बेबी वॉर्मरमध्ये ठेवल्यानंतर चालकाने रुग्णवाहिका हळूहळू पुढे न्यायला सुरूवात केली. त्यानंतर सिंहसुद्धा रस्त्यावरून बाजूला गेले. प्रसुती झालेल्या महिलेला आणि बाळाला सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अमरेली गावात नेहमीच सिंह दिसत असतात.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा
मारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त
मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक

पुतनामावशीची कणव
'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!​
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ
असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​
भारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​
‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​
'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी​

Web Title: In Gujarat, woman delivers in ambulance surrounded by 12 lions