गुज्जर आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांच्या गाड्या जाळल्या

पीटीआय
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

आरक्षणाच्या मागणीवरून गुज्जर समाजाचे आंदोलन आजही सुरूच होते, त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी सवाई माधोपूर जिल्ह्यातील रेल्वेसेवा विस्कळित राहिली. आज तिसऱ्या दिवशी आठ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, तर अन्य एका रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. 

जयपूर, नवी दिल्ली : आरक्षणाच्या मागणीवरून गुज्जर समाजाचे आंदोलन आजही सुरूच होते, त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी सवाई माधोपूर जिल्ह्यातील रेल्वेसेवा विस्कळित राहिली. आज तिसऱ्या दिवशी आठ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, तर अन्य एका रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. 

गुज्जर आरक्षण संघर्ष समितीचे मुख्य किरोडीसिंग भैंसला यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी शुक्रवार सायंकाळपासून लोहमार्गावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पश्‍चिम-मध्य रेल्वे विभागाला रेल्वेसेवेत बदल करण्यास भाग पडले आहे. या आंदोलनामुळे गेल्या दोन दिवसांत सुमारे 200 रेल्वे रद्द किंवा वळविण्यात आल्या आहेत. पर्यटनमंत्री विश्‍वेंद्र सिंह आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी नीरज के. पवन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ काल सायंकाळी भैंसला यांना भेटले. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

भैंसला हे पाच टक्के आरक्षणावर ठाम असून ते गुज्जर, रायका-रेबारी, गाडिया लुहार, बंजारा, गाडारिया समुदायाला ते आरक्षण देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आहे. हे आरक्षण सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांत असावे अशी मागणी आहे. मागणीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागण्या पूर्ण करण्यासाठी गुज्जर आंदोलकांनी 20 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. सध्या पाच समुदायांना एक टक्का आरक्षण दिले जात आहे. 

Web Title: Gujjar Agitation Aggresive in Rajasthan