pm modi sonal modi pralhad modi
pm modi sonal modi pralhad modi

नियम म्हणजे नियम! भाजपने PM मोदींच्या पुतणीला तिकीट नाकारलं

अहमदाबाद - गुजरात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या मुलीला नगर पालिकेच्या निवडणुकीचं तिकीट देण्यास नकार दिला आहे. सोनल मोदी यांनी अहमदाबाद नगर पालिकेसाठी तिकिटाची मागणी केली होती. पंतप्रधान मोदींची पुतणी असली तरी पक्षाने नियम म्हणजे नियम असं म्हणत तिकीट देणार नाही असं सांगितलं आहे. 

गुजरातमध्ये फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात स्थानिक निवडणुका होणार आहेत. सोनल या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे भाऊ प्रल्हाद यांची मुलगी आहेत. सोनल यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, त्यांनी अहमदाबाद नगर पालिकेच्या बोदकदेव वॉर्डातून निवडणूक लढण्यासाठी भाजपकडे तिकीट मागितलं आहे. भाजपने गुरुवारी त्यांच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सोनल यांचे नाव नव्हते.

सोनल यांना तिकीट का दिलं नाही याचं कारणही गुजरात भाजपने स्पष्ट केलं आहे. गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी सांगितलं की, भाजप असा पक्ष आहे जिथं नियम सर्वांसाठी एकच आहेत. पक्षाच्या नियमानुसार हा निर्णय घेतला आहे. नियमानुसार मोठ्या नेत्यांच्या नातेवाईकांना या निवडणुकीत तिकीट दिलं जाणार नाही. दुसऱ्या बाजुला सोनल यांनी सांगितलं की, त्यांनी पंतप्रधान मोदींची पुतणी म्हणून नाही तर भाजपची कार्यकर्ता म्हणून तिकीट मागितलं होतं. 

गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, राजकोट, वडोदरा, जामनगर आणि भावनगर नगरपालिकेच्या निवड़णुका 21 फेब्रुवारीला होणार आहेत. त्यानंतर मतमोजणी 23 फेब्रुवारीला होईल. राज्यात 31 जिल्हा परिषद, 231 तालुका पंचायती, 81 नगर पालिकांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com