कस्टम विभागाकडून गहाळ झालं 2 किलो सोनं; 19 वर्षांपूर्वी होतं 3 किलो

gold
gold

नवी दिल्ली - सध्या गुजरातमध्ये कस्टम विभागाच्या ऑफिसमधून 2 किलो सोनं गायब झाल्यानं सध्या चर्चा सुरू आहे. जामनगर कस्टम विभागाच्या कार्यालयातून 1 कोटी 10 लाख रुपयांचं सोनं गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कस्टम विभागातील अज्ञात कर्मचऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच लोकांनी तब्बल चार वर्षे सोन्याच्या प्रकरणाची चौकशी केली होती. 

जामनगरच्या बी डिव्हिजनमधील पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनं भूज कस्टम डिपार्टमेंटचं होतं. 2001 च्या भूकंपानंतर जामनगर इथल्या कार्यालयात ठेवलं होतं. भूज कार्यालयातील अधिकारी जेव्हा हे सोनं ताब्यात घेण्यासाठी पोहोचले तेव्हा यात 1 कोटी 10 लाख रुपयांचे  2 हजार 156 ग्रॅम सोनं गहाळ झालं असल्याचं आढळलं.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मते 2001 मध्ये कच्छच्या भूज कस्टम विभागाने भूकंपात इमारत पडल्यामुळे 3 किलो 149 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं होतं. त्यावेळी सोनं सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जामनगर कस्टम विभागाकडे सोपवण्यात आली होती. 

2016 मध्ये जेव्हा भूज कार्यालयाचे सुशोभिकरण झाले तेव्हा भूज कस्टम विभागाने जामनगर कार्यालयाने सील केलेलं सोनं त्यांच्या ताब्यात घेतलं. ज्या सूटकेसमध्ये सोनं ठेवण्यात आलं होतं त्याची चावी मागितली असता ती हरवल्याचं सांगण्यात आलं. तेव्हा सूटकेसचं लॉक तोडण्यात आलं होतं. नंतर भूज कस्टम विभागाने सोनं तपासलं तर त्यात 2 किलो सोनं कमी असल्याचं समोर आलं. 

याआधी सीबीआयच्या कस्टडीतून जवळपास 45 कोटी रुपयांचे सोने गहाळ झाले होते. सीबीआयच्या पथकाने  2012 मध्ये चेन्नईत टाकलेल्या छाप्यात तब्बल 400 किलो सोनं जप्त केलं होतं. हे सर्व सोनं सील करून सीबीआयच्या कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. मात्र आता त्यात103 किलो सोनं कमी आढळलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com