राज्यसभेसाठी गुजरात काँग्रेस आमदारांसाठी व्हिप जारी

महेश शहा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

अहमदाबाद : आगामी राज्यसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या "नोटा' अधिकाराचा गैरवापर हाण्याच्या शक्‍यतेने आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल शंका उपस्थित करत काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून आज व्हिप जारी केला. शंकरसिंह वाघेला यांच्यासह 51 आमदारांना व्हिप लागू केला असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यास अपात्र ठरवण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

गुजरात विधान परिषदेचे काँग्रेसचे नेते प्रतोद शैलेश परमार यांनी व्हिपी जारी करत येत्या 8 ऑगस्टला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत "नोटा' हा पर्याय वापरू नये आणि भाजप उमेदवाराला मत देऊ नये याबाबत कडक निर्देश दिले आहे. अहमद पटेल यांना काँग्रेसकडून पाचव्यांदा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे, जर व्हिपचे उल्लंघन करून कृती केल्यास कडक कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, अशी तंबीही परमार यांनी दिली. नोटाचा वापर हा व्हिपचे उल्लंघन नसून त्यासंबंधी अपप्रचार केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या 4 ऑगस्टला गुजरातच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या वेळी त्यांच्यासमवेत गुजरात काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी असणार आहेत. त्याचदिवशी राजस्थानलादेखील भेट देण्याची शक्‍यता आहे. या वेळी ते राज्यसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

Web Title: gujrat news congress mla and rajya sabha