अर्भकांच्या मृत्यूवरून गुजरात सरकार धारेवर

महेश शहा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

रुग्णालयाकडून चौकशीसाठी समिती; कॉंग्रेसची निदर्शने

अहमदाबाद: येथील सरकारी रुग्णालयात शनिवारी (ता. 28) नऊ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील भाजप सरकारला नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या चार दिवसांत इन्क्‍युबेटरमधील 27 अर्भके मृत्युमुखी पडल्याने विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही सरकारला धारेवर धरले आहे.

अर्भकांच्या मृत्यू प्रकरणामुळे धक्का बसलेल्या सरकारने या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी रुग्णालयात धाव घेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर रुग्णालयाच्या निरीक्षकांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. राघव दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करत चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयाने निष्काळजीपणाचा आरोप अमान्य केला आहे. ही अर्भके ही अत्यंत चिंताजनक अवस्थेत रुग्णालयात शनिवारी आणली गेली असल्याचा दावा आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाचे अधिकारी पूनमचंद परमार यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशप्रमाणेच भाजपशासित गुजरातमध्येही बालकांच्या मृत्यूची घटना घडल्याने निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला आयताच मुद्दा हाती मिळाला आहे. कॉंग्रेसने रुग्णालयाविरोधात जोरदार निदर्शने केली. तसेच गरिबांच्या मुलांबाबत भाजपचा निष्काळजीपणा यातून दिसून येत असल्याचा आरोपही केला.

Web Title: gujrat news Government of Gujarat on the death of infants dies