मी मर्द आहे: हार्दिक पटेल

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

अहमदाबाद (गुजरात): 'मी मर्द आहे. नपुंसक नाही. जे काही करायचं असेल तर छातीठोक करेन. जर व्हिडीओमधील व्यक्ती मी असतो तर थेट समोर आलो असतो,' असे पाटिदार नेते हार्दिक पटेलने म्हटले आहे.

हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने गुजरातमध्ये आज एकच खळबळ उडाली. ""गुजरातमध्ये भाजपच्या घाणेरड्या राजकारणाला सुरवात झाली आहे. कितीही बदनामी केली तरी मला फरक पडणार नाही, पण गुजरातमधील महिलांचा अपमान केला जात आहे,'' अशी टीका यानंतर हार्दिक पटेलने केली. शिवाय, हे सगळं भाजपचे कट-कारस्थान असल्याचा थेट आरोपही त्यानं केला आहे.

कथित व्हिडिओवरून सोशल नेटवर्किंगसह राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक पटेलने सर्व आरोप भाजपचे कट-कारस्थान असल्याचा म्हटले आहे. 'ही सेक्स सीडी बनावट आहे. भाजपच्या घाणेरड्या राजकारणाचा हा भाग आहे. भाजपने माझ्या खासगी आयुष्यावरच हल्ला केला आहे. 'असले' उद्योग करणारे भाजपमध्ये अनेक लोक आहेत. मी सुद्धा लवकरच त्यांची पोलखोल करणार आहे,' असा इशारा त्यानं दिला आहे. यामुळे यापुढील काळात गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.

गुजरातमधील राजकारणाने सोमवारी (ता. 13) खालची पातळी गाठली. हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ 16 मे रोजीचा असून एका हॉटेलच्या खोलीत ते चित्रित करण्यात आले आहे. हा बनावट व्हिडिओ असल्याचा दावा हार्दिक पटेलच्या समर्थकांनी केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हार्दिक पटेलने ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. ""गुजरातमध्ये घाणेरड्या राजकारणाला सुरवात झाली. मला कितीही बदनाम करा, मला फरक पडणार नाही,'' असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना हार्दिक म्हणाला, ""गुजरातमधील सहा कोटी जनता माझ्यासोबत आहे. भाजपविरोधातील लढा सुरूच राहणार. भाजपची जुनी सवय आहे. संजय जोशी लोकप्रिय होत असताना भाजपने हीच खेळी खेळली होती.'' सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणाने पाटीदार समाजातील अन्य नेत्यांचेही व्हिडिओ माझ्याकडे आहेत, असा दावा केला आहे.

Web Title: gujrat news Hardik patel dismissed the video clips as part of “dirty politics of BJP