शेतकऱ्यांसाठी केंद्राचे सात सूत्री धोरण: जावडेकर

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

बडोदा: शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सूत्री धोरण तयार केले असून, त्यानुसार सिंचनवाढ, उत्तम बियाण्यांचा पुरवठा, तसेच कापणीनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

आणंद येथे आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. जावडेकर म्हणाले, ""आगामी काळात शेती उत्पादनात वाढ करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास सरकारचे प्राधान्य राहणार आहे. सात सूत्री धोरणामध्ये सिंचनावर मोठा भर देण्यात आला असून, पिकांच्या कापणीनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी गोदामे तसेच शीतगृहे यांमध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.''

शेतकऱ्यांमध्ये अन्नप्रक्रियेविषयी जनजागृती करण्याचाही सरकारचा मानस असून, शेतकऱ्यांच्या मालाला राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ई-प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 585 केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. पीकविमासंदर्भात काही नवीन योजनाही अमलात आणल्या जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

Web Title: gujrat news prakash javdekar and farmer