दहशतवादी कारवायांवरून पाकला इशारा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

भारत-जपानचे संयुक्त निवेदन; सहकार्य भक्कम करण्यावर सहमती

गांधीनगर : दहशतवाद कदापि सहन न करण्याच्या धोरणावर भर देताना भारत आणि जपानने अल कायदा, तसेच पाकिस्तानस्थित जैशे महंमद आणि लष्करे तैयबासारख्या दहशतवादी संघटनांविरुद्धचे सहकार्य आणखी भक्कम करण्यावर आज सहमती दर्शविली. अप्रत्यक्षपणे हा पाकिस्तानला इशारा मानला जात आहे.

वार्षिक शिखर परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी पाकिस्तानला 2008 चा मुंबई दहशतवादी हल्ला आणि 2016च्या पठाणकोट हल्ल्यासह अन्य दहशतवादी हल्ले घडविणाऱ्यांना न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभे करण्यास सांगितले. दोन्ही नेत्यांनी दहशतवादी आणि हिंसक राष्ट्रवादाच्या वाढत्या घटनांची कठोरातील कठोर शब्दांत निंदा केल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

संयुक्त निवेदनानुसार, कोणत्याही प्रकारचा दहशतवाद एक जागतिक शाप आहे आणि त्याचा कदापि सहन करण्याच्या भावनेसह सामूहिक जागतिक कारवाईअंतर्गत जोरदार पद्धतीने सामना केला गेला पाहिजे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी सर्व देशांना दहशतवाद्यांची आश्रयस्थाने, त्यांच्याशी संबंधित पायाभूत सुविधा नष्ट करण्याचे, तसेच दशतवादी जाळे आणि त्याला अर्थपुरवठा करणारी संपर्कस्थाने मुळापासून उखडून टाकण्याचे आवाहन केले. त्याच वेळी सीमेपलीकडील दहशतवादी कारवायांना आळा घालण्यावरही भर दिला.

Web Title: gujrat news Predatory warning from terrorist activities