गुजरातमध्ये पावसाने पूरस्थिती; एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

राजकोट/अहमदाबाद: गुजरातमधील मोरबी, सुरेंद्रनगर आणि राजकोट जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या व तलाव दुथडी भरून वाहू लागले. पावसामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.

गेल्या 24 तासांत सुरेंद्रनगरमधील चोटिला येथे 450 मि. मी. पावसाची नोंद झाली. मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथे 340 मि. मी पाऊस पडला. राजकोटमध्ये आज सकाळी 11 पर्यंत 400 मि. मी पाऊस पडला. पावसाचा जोर जास्त असल्याने नदीकाठी व धरणांच्या जवळ राहणाऱ्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राजकोटमध्ये निवासी भागात पाणी साचल्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी आज सकाळी तातडीची बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. टंकारा व चोटिला येथे तैनात राहण्याचा आदेश "राष्ट्रीय आपत्ती निवारण दला'च्या (एनडीआरएफ) पथकांना त्यांनी दिला. राजकोटमधील लोढिका तालुक्‍यातील जेता कुबा गावातील नवलभाई खुंट (वय 45) व त्यांची पत्नी आज सकाळी वाहून गेली. खुंट यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांच्या पत्नीला वाचविण्यात यश आल्याचे जिल्हाधिकारी विक्रांत पांडे यांनी सांगितले.

Web Title: gujrat news rain all over gujrat